सांगली : आठ दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेल्या प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आरग (ता. मिरज) येथे गुरूवारी रात्री उघडकीस आला. आरग येथे गणपती मंदिराजवळीला नाईक वस्ती येथे भाड्याच्या घरात आठ दिवसापुर्वी वास्तव्यास आलेल्या सुनील पोपट कोळी (वय २४ रा. बिचुद, ता. वाळवा) आणि निकिता मिलिंद कांबळे (वय २० रा. मोराळे, ता. पलूस) या दोघांनी भाड्याच्या घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेउन आत्महत्या केली.

आठ दिवसापुर्वीच दोघेही आपले गाव सोडून राहण्यासाठी आरग येथे आले होते. यामुळे त्यांचा फारसा परिचय या ठिकाणी नव्हता. काल दुपारी सुनिल कोळी हा घराबाहेर गेला होता. सायंकाळी घरी आल्यानंतर तरूणीने आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर त्यानेही आत्महत्या केली. हा प्रकार आजूबाजूला राहणार्‍या लोकांच्या लक्षात उशिराने आला. यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास संपर्क साधण्यात आल्यानंतर दोघांच्या आत्महत्येचा प्रकार समोर आला.

srikant shinde meet salman khan marathi news
सातारा: सलमानच्या भेटीसाठी खासदार श्रीकांत शिंदे
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
manoj jarange laxman hake
“…तर तुम्ही राजकारण विसरून जाल”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, “या सत्ताधाऱ्यांना आमची…”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?

हेही वाचा : “…तर तुम्ही राजकारण विसरून जाल”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, “या सत्ताधाऱ्यांना आमची…”

दरम्यान, स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार दोघांचेही यापुर्वी विवाह झाले होते. मात्र, एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडप्याने आरग गावी येउन एकत्र वास्तव्य करण्याचा विचार केला होता. मात्र, काल त्यांच्यामध्ये कुरबुर झाली असावी यातूनच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर दोघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात शुक्रवारी दुपारी देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.