रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याने पालकांनी या शिक्षकाला यथेच्छ चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या शिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याला तात्काळ शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी संस्थेमार्फत चौकशी करण्यात येऊन त्या शिक्षक आणि पालकांना मारहाण करणा-यावर शाळेच्या शिपायावर कारवाई करण्याचे आश्वासन संस्थेकडून देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थिनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने मार्क पाहिजे असतील, तर मला खूश ठेवावे लागेल, असे सांगत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याने शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप देत शहर पोलिसांच्या अहवाली केले. प्रथमेश चंद्रकांत नवेले (रा. नाचणे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबत पीडित विद्यार्थीनीने शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा तक्रार दिली. सोमवारी घडलेल्या या प्रकाराने रत्नागिरी शहरात आणि शैक्षणीक क्षेत्रात चांगलीच खळखळ उडाली आहे.

हेही वाचा : Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

शाळेत शेती व पशुपालन या विषयाचे प्रॅक्टिकल सुरु असताना पीडितेसह तिच्या दोघी मैत्रीणी अशा तिघीच बॅचला होत्या. प्रॅक्टिकल शिकवण्यासाठी त्या शिक्षकाने गुलाबाच्या फांद्या आणल्या होत्या. त्यांचे कलम कसे तयार करायचे, हे शिकवत असताना गुलाबाची रोपे पिशवित लावण्यास सांगितले. तेव्हा पीडितेच्या दोन्ही मैत्रिणी माती आणण्यासाठी प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर मैदानात गेल्या होत्या. तेव्हा शिक्षक प्रथमेश नवेलेने पीडिता एकटीच असल्याची संधी साधत तिच्या जवळ जात थांब तुला फांदी कापायला शिकवतो, असे म्हणाला. त्यावर पीडितेने त्याला नको, असे सांगितले. तरीही त्याने पीडितेचा हात धरुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच मार्क पाहिजे असतील तर मला खूश ठेवावे लागेल, असे म्हणाला. तेव्हा पिडीता घाबरुन प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर निघून गेली होती. त्यानंतर घाबरल्यामूळे तिने दोन दिवस याबाबत कोणालाही सांगितले नाही.

हेही वाचा : Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण

मात्र तिने ११ जानेवारी रोजी हा सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. तेव्हा त्यांनीही नवेले सर आपल्या सोबतही असेच अश्लिल प्रकार करत असल्याचे त्यांनी पीडितेला सांगितले. पीडीतेच्या मैत्रिणीने ही सर्व हकिकत पीडीतेच्या आईला फोनव्दारे कळवल्यानंतर सोमवार १३ जानेवारी रोजी या सर्व विद्यार्थीनींचे पालक शाळेत धकडले. पालकांनी हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर प्रथमेश नवेलेने या सर्व विद्यार्थीनी खोटे बोलत असल्याचा सांगून त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. मात्र यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या शिक्षकाला पालकांच्या ताब्यातून सोडवत चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याघटनेनंतर संस्थेचे पदाधिकारी नियामक मंडलाचे सदस्य शाळेत हजर होवून संबंधित गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाला पाठिशी न घालता तातडीने निलंबन केले. संस्थेमार्फत संबंधित घटनेची आणि पालकांना मारहाण करणा-या शिपायाचीही चौकशी करणार असून आरोपात तथ्य आढळले तर योग्य कार्यवाही करणार असल्याचे संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ratnagiri district school teacher misbehaved with girls css