सातारा : राजा शिवछत्रपती चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेला कलाकार बुडाला. सिनेअभिनेते रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाच्या चित्रीकरण संपल्यानंतर ही घटना घडली. याची नोंद सातारा पोलिसांत झाली आहे. सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव आहे. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. बुधवारी सायंकाळी साडेसहानंतर प्रकाश कमी झाल्यानंतर हा शोध थांबवण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी चित्रीकरण संपल्यानंतर सौरभ आणि त्याचे मित्र संगमावरील पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. त्यानंतर खोल पाण्याच्या डोहात सौरभ शर्मा बुडाल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. मात्र, त्यानंतर तो आढळून आला नाही. अभिनेता रितेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली असता शिवेंद्रसिंहराजे भोसले बचाव पथकाचे दहा सदस्य, तसेच गावातील काही पट्टीचे पोहणारे यांनी एकत्रितरीत्या रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली; परंतु त्याला यश आले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara artist drowned in krishna river css