कराड : कृष्णा परिवाराने पाच दशकांपासून अविरतपणे समाजातील सामान्य घटकाचे जीवनमान उंचावण्याचे केलेले कार्य प्रेरणादायी असून, ते महाराष्ट्र राज्य आणि देशासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी काढले.
कराड दौऱ्यावरील मंत्री जयकुमार रावल यांनी कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र तसेच कृष्णा सहकारी बँक आदी कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्थांना भेट देऊन तेथील कामकाजाची आणि संस्थांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
या वेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती तथा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कृष्णा विश्वस्त न्यासाच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख विश्वस्त विनायक भोसले यांनी भाजप नेते, मंत्री जयकुमार रावल यांना आपल्या कृष्णा परिवारातील वैद्यकीय, संशोधन, सहकार, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधन कार्यातील सर्वच संस्थांचा सविस्तर परिचय करून दिला. याप्रसंगी मंत्री जयकुमार रावल बोलत होते. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले हेही या वेळी उपस्थित होती.
मंत्री जयकुमार रावल त्यांनी कृष्णा विद्यापीठ व कृष्णा रुग्णालयातील विविध विभागांना, तसेच कृष्णा सहकारी बँक आणि सरिता बझार आदी संस्थांना भेट देऊन या वेळी पाहणी केली. या वेळी बोलताना जयकुमार रावल पुढे म्हणाले की, आम्ही कृष्णा उद्योग समूह आणि एकूणच कृष्णा परिवाराची ख्याती मी ऐकत आलो आहोत. मात्र, प्रत्यक्ष भेट दिली. तेथील प्रत्यक्ष भेटीवेळी घेतलेल्या सविस्तर माहितीतून कृष्णा परिवाराच्या कार्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले. कृष्णा परिवाराने महाराष्ट्रासह देशभर निश्चितपणे अनन्यसाधारण व महत्त्वाचे कार्य प्रचंड स्वरूपात केले आहे. एवढे विशाल विश्व उभे करणे सोपे नाही. हीच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या परिसरात काही निर्माण करू शकलो, तर ते आमच्यासाठी फार मोठे नव्हे प्रचंड मोठे काम ठरणार आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, वैद्यकीय प्रशासक डॉ. आर. जी. नानिवडेकर, कृष्णा फाउंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. विनोद बाबर, कृष्णा परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव जाधव, कृष्णा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव आदी कृष्णा परिवारातील पदाधिकारी, अधिकारी तसेच कार्यकर्ते सुद्धा या वेळी उपस्थित होते.