कोल्हापूर : आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असलेला वैभववाडी तालुक्यातील गगनबावडा घाट दरड कोसळल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. ही घटना आज, सकाळी ८ वाजता घडली. गेल्या काही दिवसांपासून या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटात मोठी दरड कोसळली. या दरडीत मोठे दगड असल्याने ते हटवण्याच्या कामात अडचण येत आहे. ​सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी असून ढिगारे बाजूला काढण्याचं काम वेगाने सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी पुन्हा खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.