लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून दिवसाढवळ्या दरोडे, लूट, खून यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. नशेच्या गोळ्यांची विक्रीसह अवैध व्यवसाय जोमाने सुरु आहेत. गुन्हेगारावर वचक ठेवण्यात पोलीस विभाग कुचकामी ठरत असून समाजकंटकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

दोन दिवसापूर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या दुकानावर पिस्तुलाचा धाक दाखवत १४ कोटींची लूट झाली. महिलांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार रोज घडत आहेत. महिलावरील अत्याचारात वाढ झाली आहे. नशेबाज तरुण राजरोसपणे सामान्यांना धमकावून, प्रसंगी मारहाण करुन लुटत आहेत. गंभीर प्रकार घडूनही पोलीस यंत्रणा सुस्त असून कायद्याचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. तातडीने याची दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन आ. गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मंगळवारी दिले. याची दखल घेत फडणवीस यांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन आ. गाडगीळ यांना दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law and order has deteriorated in the district police ineffectiveness statement by mla sudhir gadgil mrj