रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील ६ खत विक्रेत्याने जिल्हा कृषी विभागाच्या अधिका-यांनी खत विक्री दुकान परवाने रद्द करण्याची कारवाई केली आहे. रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे न केल्याने तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यातील ६ खत विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर ५ विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
शासकीय नियमांच्या अधीन राहून खत विक्रेत्यांना रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र तरीही तपासणीमध्ये काही विक्रेते या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले. खत नियंत्रण आदेशाचे हे स्पष्ट उल्लंघन असल्याने कृषी विभागाने ही कारवाई केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील इतर सर्व खत विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावरही अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा कृषी अधिक्षक श्री. सदाफुले यांनी दिला आहे.
जिल्ह्यात निलंबित करण्यात आलेले परवाने –
१. चिपळूण तालुका – ५
२. रत्नागिरी तालुका – १
सक्त ताकीद देण्यात आलेले तालुक्यातील विक्रेते
१.चिपळूण तालुका – ४
२.दापोली तालुका – १