नवापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी वीज कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी झाले. नवापूर परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली.
  भरडू येथे वीज कोसळून हंसराज भरत पाडवी (५०) आणि हर्षल सुरेश वळवी (१०) हे दोघे ठार झाले. तर, त्यांच्यासमवेत असलेले नीहिहा वळवी, अशोक वळवी, गोटूबाई वळवी हे तिघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विसरवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lightning claims two lives in nandurbar