सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांच्यावतीने काल चंद्रग्रहणानिमित्त सांगलीतील खगोल प्रेमी नागरिकांच्यासाठी ’चला पाहूया दुर्बिणीतून चंद्रग्रहण’ हा कार्यक्रम डॉ. निटवे हॉस्पिटल विश्रामबागच्या गच्चीवर उत्साहात पार पडला. यावेळी सांगली मधील खगोल प्रेमी नागरिकांनी दुर्बिणीतून चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.

ग्रहणावेळी आकाशातील शनि, शनीचे कडे तसेच अभिजीत, हंस, श्रवण, भाद्रपदा ही नक्षत्रे खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे यांनी दाखवली. अभिषेक माने, कौस्तुभ पोळ यांनी दुर्बिणीतून आपल्या मोबाईल कॅमेर्यातून चंद्रग्रहणाच्या विलोभनीय कला तसेच शनीग्रहाची कडी व त्यांचे चंद्र यांचे प्रतिमा टिपल्या.

डॉ. निटवे यांनी या चंद्रग्रहणाबद्दल शास्त्रीय माहिती दिली. ते म्हणाले की, चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ग्रहण पाहणे अशुभ नाही्. गरोदर मातेवर आणि गर्भावर ग्रहणाचा वाईट परिणाम होतो अशी भीती घातली जाते, पण याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ग्रहणामुळे गर्भाला व्यंग निर्माण होत नाही तर ते जूनकीय दोषामुळे किंवा काही औषधामुळे वा व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे निर्माण होते. सोनोग्राफीद्वारे केलेल्या तपासणीत बाळांचे ओठ, हातपाय हृदय इत्यादी अवयवांमध्ये दोष आहे कि नाही हे कळते. तरीही ग्रहण पाळणे यासारखी अनावश्यक कृती करायला लावून गरोदर स्त्रीयांना फार मानसिक त्रास दिला जातो. हे थांबवण्यासाठी सरकारने आरोग्य खात्यामार्फत समाजजागृती करणे आवश्यक आहे.

अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, ग्रहणाच्या पार्शभूमीवर ग्रहणाविषयी अत्यंत चुकीचे आणि गैरसमज पसरणारे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. अंधश्रद्धा परवणार्या संदेशावर लोकांनी विडास ठेवू नये. ग्रहणामुळे अन्नपाणी दूषित होत नाही. ग्रहणातून कोणतेही हानिकारक किरण बाहेर पडत नाहीत. विज्ञानलेखक जगदीश काबरे म्हणाले की, विवेकी विचारांच्या जनतेने ग्रहणास अशुभ मानून या सुंदर खगोलीय घटनेस बदनाम करू नये.

ग्रहणावेळी आकाशातील शनि, शनीचे कडे तसेच अभिजीत, हंस, श्रवण, भाद्रपदा ही नक्षत्रे खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे यांनी दाखवली. अभिषेक माने, कौस्तुभ पोळ यांनी दुर्बिणीतून आपल्या मोबाईल कॅमेर्यातून चंद्रग्रहणाच्या विलोभनीय कला तसेच शनीग्रहाची कडी व त्यांचे चंद्र यांचे प्रतिमा टिपल्या.

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ग्रहण पाहणे अशुभ नाही. गरोदर मातेवर आणि गर्भावर ग्रहणाचा वाईट परिणाम होतो अशी भीती घातली जाते, पण याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ग्रहणामुळे गर्भाला व्यंग निर्माण होत नाही. तरीही ग्रहण पाळणे यासारखी अनावश्यक कृती करायला लावून गरोदर स्त्रीयांना फार मानसिक त्रास दिला जातो. हे थांबवण्यासाठी सरकारने आरोग्य खात्यामार्फत समाजजागृती करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. यावेळी डॉ. शोभना निटवे, डॉ. शीतल प्रसाद भरमगुडे, दिनेश कुडचे, सुदर्शन चोरगे, सुहास गवळी, अमित काटकर, पुनम पाठक उपस्थित होते.