maharashtra and karnataka--states-temporarily-stopped-bus-services due to border dispute | Loksatta

कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यातील एसटी सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय

कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांचा हा पवित्र लक्षात घेऊन दुपारनंतर पुन्हा दोन्ही राज्यातील वाहतूक बंद करण्यात आली.

कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यातील एसटी सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय
संग्रहित छयाचित्र

कर्नाटका- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यातील एसटी सेवा वारंवार विस्कळीत होवू लागली आहे. या वादात प्रवाश्यांची गैरसोय होवू लागली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर कर्नाटकचा दावा सांगितल्यानंतर नव्याने वाद सुरु झाला. काल कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बोम्माई यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. त्यांनी बस स्थानकात जाऊन आंदोलन केले. यामुळे कर्नाटक -महाराष्ट्र दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक सेवा बंद झाली.

हेही वाचा- “मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!

परिस्थिती लक्षात घेऊन शनिवारी सकाळी महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यातील परिवहन सेवा सुरू झाली. दुपारपर्यंत वाहतूक सुरू होती. यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला. दुपारी कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा फाडून टाकल्या. बंगरुळूमधून पुढील आठवड्यात बेळगावला हजार कार्यकर्ते जातील आणि कन्नड जनतेचे रक्षण करू, असे आव्हानात्मक विधान संघटनेच्या प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना केले. त्यांचा हा पवित्र लक्षात घेऊन दुपारनंतर पुन्हा दोन्ही राज्यातील वाहतूक बंद झाली.

हेही वाचा- बेळगावातील चार तरुणींचा किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू

खाजगी वाहतूक जोमात

दरम्यान कोल्हापूर वगळता जिल्ह्याच्या अन्य काही आगारांमधून कर्नाटकला एसटी सुरू होती. तर कर्नाटकातूनही महाराष्ट्रामध्ये बस येत होत्या. वाद पाहून प्रवाशी खाजगी वाहनाकडे वळले आहेत. अधिक दर आकारून ही वाहतूक सुरु होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 18:49 IST
Next Story
VIDEO: “त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही, कारण…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला