Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सिल्लोड येथून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या अब्दुल सत्तार यांचा विजय झाला आहे. तर कन्नड येथून शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरणारे व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आलेले हर्षवर्धन जाधव यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेले आहे. शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला आहे. कन्नडमध्ये मात्र हर्षवर्धन जाधव यांची मोठी ताकद असताना शिवसेनेने त्यांचा पराभव केला आहे.
याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कैसार आझाद शेख यांचा पराभव केला आहे.