राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. भाषण असो किंवा पत्रकार परिषद…अजित पवार कधीही हातंच राखून बोलत नाहीत. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव पुन्हा एकदा नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सर्वांना आला. सहकारमंत्री अतुल सावे समोर येताच अजित पवार यांनी त्यांना चिमटे लगावले. यानंतर अतुल सावे यांनीही त्यांच्यासमोर हात जोडले. अजित पवारांची ही टोलेबाजी पाहून रोहित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह उपस्थित इतर आमदारांनाही हसू आवरत नव्हतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maharashtra Assembly Session: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे खोटं ट्वीट करणाऱ्याची माहिती मिळाली, एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले “कोणता पक्ष…”

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनासाठी सभागृहात जाण्याआधी अजित पवार आणि अतुल सावे यांची भेट झाली. सभागृहाबाहेर झालेल्या या भेटीदरम्यान अजित पवारांनी अतुल सावे यांना “मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदललात” असा चिमटा काढला.

Maharashtra Assembly Session: “ए शांत बसा रे”, CM शिंदे विरोधकांवर संतापले; अजित पवारांना म्हणाले “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”

अजित पवार म्हणाले “‘साहेब मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदलला आहात. मी देवेंद्रजींना अनेकदा सांगतो की, सावे साहेबांना सांगा इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. सत्ता येत असते, सत्ता जात असते, माणसं जोडायची असतात”. त्यावर अतुल सावे “तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव कसा आहे,” असं उत्तर देतात. यानंतर दोन्ही नेते सभागृहात जाण्यासाठी रवाना होतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly wintr session ncp ajit pawar meets bjp atul save sgy