Maharashtra Board Results 2025 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षा मुलींना बाजी मारली आहे
मुलांचा अन् मुलींचा निकालात किती आहे फरक?
मुलींची यंदा बारावीची टक्केवारी ९४.५८ टक्के इतकी आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.
Direct link to check Maharashtra HSC Result 2025
विभागनिहाय निकाल
पुणे-९१.३२ टक्के
कोकण- ९६.७४ टक्के
नागपूर- ९१.३२ टक्के
छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के
मुंबई- ९२.९३ टक्के
कोल्हापूर- ९३.६४ टक्के
अमरावती- ९१.४३ टक्के
नाशिक – ९१.३१ टक्के
लातूर – ८९.४६ टक्के
कुठल्या वेबसाईटवर निकाल पाहू शकणार विद्यार्थी
http://hscresult.mkcl.org
http://hscresult.mkcl.org
mahahssboard.in
Results.targetpublications.org
Results.navneet.com
HSC निकाल कसा पाहायचा?
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – mahresult.nic.in
- “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा
- आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका
- “Submit” वर क्लिक करा
- निकाल स्क्रीनवर दिसेल – त्याची PDF डाउनलोड करा