Marathi News Update : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रात्री उशिरा अटक झाली आहे. पॉर्नस्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटकेवरून सामनात अग्रलेख लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे. तसंच काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनीही भाजपावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फडतूस या शब्दावरून कलगीतुरा रंगल्याचं पाहण्यास मिळालं. संजय राऊत यांनी तुमच्याकडे ईडी सीबीआयचं काडतूस आहे असं म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना अयोध्या आम्ही दाखवली असाही टोला लगावला आहे. या आणि अशा अनेक घडामोडींवर आपली नजर असणार आहे. लोकसत्ताच्या या लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या दिवसभरातले महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Marathi News Live Update | ‘फडतूस’ आणि काडतूस’ शब्दांवरचा कलगीतुरा आजही सुरू राहणार?
कलगीतुरा आजही सुरू राहणार? वाचा महत्त्वाच्या घडामोडी
भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मंदावण्याचा सुधारित अंदाज जागतिक बँकेने मंगळवारी वर्तवला. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये वर्तवलेला ६.६ टक्के विकास दराचा अंदाज आता जागतिक बँकेने ६.३ टक्क्यांवर आणला आहे. सविस्तर वाचा…
सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर पुन्हा एकदा घणाघाती टीका करण्यात आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. पॉर्न स्टारला पैसे दिल्याच्या आरोपात ही कारवाई झाली. अशी कारवाई झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष आहेत.याच घटनेचा उल्लेख करत सामनातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. उद्या डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील. ट्रम्प यांचे सूटबूट भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला. त्यावरून चांगलंच राजकारण रंगताना दिसतं आहे.