Maharashtra Latest News Live Updates, 24 January 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच डाव्होस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात झालेल्या अवाढव्य खर्चावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चार दिवसात साधरणत: ३५ ते ४० कोटी रुपये खर्च केल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवाय या डाव्होस दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत अधिकृतपणे कोण गेलं होतं? आणि अनधिकृतपणे कोण गेलं होतं? यावरूनही सवाल उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Live Updates

Maharashtra Live Updates : देश, विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर….

11:06 (IST) 25 Jan 2023
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण; मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने आंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांनी काही अटींसह आठ आठवड्यांचा जामीन देण्यात आला आहे.