कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. जखमींना सीपीआर जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंतनू शिरीष कुलकर्णी (२८, मोरेवाडी) व शुभम हेमंत सोनार (२४, राजारामपुरी) अशी मृतांची नावे आहेत. सौरभ रवींद्र कणसे (२६, राजारामपुरी) व संकेत बाळकृष्ण कडणे (२१, सांगली) हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा : दुचाकीवरील ताबा सुटल्याने सांगलीत भीषण अपघात; तीन युवक ठार, अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

अपघातातील चौघेजण इनोवा मोटारीतून कोल्हापूर जवळील वाशी या गावी गेले. तेथून जेवण करून मध्यरात्री ते परत येत होते. ही मोटार शुभम चालवत होता. कोल्हापूरजवळ असलेल्या पुईखडी टेकडीवर मोटारीचा ताबा सुटल्याने ती २५ फूट खोल दरीत कोसळून उलटली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major accident in kolhapur two dead two injured pbs