लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट करीत, राज्य शासनाने जाहीर केलेले दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाने मान्य करावे, असे आवाहन रिपाइं नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

आणखी वाचा-सोलापूर व शिर्डी लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी रामदास आठवले आग्रही

सोलापुरात प्रसार माध्यमांशी बोलताना आठवले यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य केले. जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा विषय केंद्र शासनाचा आहे. जर या समाजाला ओबीसी आरक्षण दिले तर उद्या अन्य क्षत्रिय समाजांपैकी जाट, राजपूत आदी जातींनाही ओबीसी आरक्षण द्यावै लागणार आहे. न्यायालयामध्येही मराठा ओबीसी आरक्षण टिकणार नाही, असे मत व्यक्त करीत, मनोज जरांगे-पाटील यांनीही आपला हट्ट सोडावा, असे आवाहन आठवले यांनी केले.