पंढरपूर : सोलापूर येथील चिंचोली येथील एमआयडीसीमधील एका रासायनिक कंपनीला शुक्रवारी अचानक आग लागण्याची घटना घडली. या कंपनीमध्ये रासायने असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीचा डोंब दूरपर्यंत दिसत आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, अग्निशामक दलाकडून उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे.

सोलापुरातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमधील तुळजाई असोसि. प्रा. लि. या रासायनिक कंपनीला शुक्रवारी अचानक आग लागली. या कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. मात्र, अचानक आग लागली आणि पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले. सुरुवातीला एकाच विभागात लागलेली ही आग काही वेळात सर्वत्र पसरली आणि कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या कंपनीत कामगार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाची गाडी आग विझवण्यासाठी पोहोचली. कंपनीला लागलेल्या आगीचे डोंब दूरपर्यंत दिसत होते. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. तसेच काही आवाज आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कंपनीच्या वरच्या भागात वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

मात्र, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अचानक आग लागली आणि पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले. सुरुवातीला एकाच विभागात लागलेली ही आग काही वेळात सर्वत्र पसरली आणि कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या कंपनीत कामगार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग विझवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. ती नियंत्रणात आल्यावर हानीचा तपशील समजू शकणार असल्याचे सांगण्यात आले.