नांदेड : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६.५२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ३.८ अशी नोंदविण्यात आलेली आहे.

आणखी वाचा-Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…

भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mild earthquake tremors in nanded district center point in hadgaon taluka mrj