सांगली: माजी मंत्री संजय राठोड यांना निर्दोषत्व (क्लिनचिट) देण्यात महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत असून आताही या प्रवृर्त्तीविरूध्द माझा लढा सुरूच राहणार असल्याचे भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी सांगलीत पत्रकार बैठकीत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीमती वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आपण राठोड यांच्यावर कारवाईसाठी आग्रह  केला, आजही करत असून उद्याही हा संघर्ष सुरूच राहील. पिडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी आपणच पुढाकार घेउन जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे. राठोड यांना निर्दोष ठरविण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस अधिकारी अभिताभ गुप्ता यांचीही यामध्ये न्यायालयात बाजू स्पष्ट होईलच. न्याय व्यवस्थेवर आपला विश्‍वास असून योग्य तो न्याय मिळेलच याची खात्री असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “…अन्यथा मुंबईत येऊन अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू”, आमदार बच्चू कडूंचा इशारा

त्या म्हणाल्या, लव्ह जिहाद कायदा करावा अशी आपली मागणी असून १८ वर्षाखालील मुलींना जबरदस्तीने पळूवन नेउन अत्याचार केले जातात याला आमचा विरोध आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायद्याची गरज आहे. सध्या मुलींचे वयात येण्याचे वय कमी झाले असून यामुळे १३-१४ वयाच्या मुलींवर गर्भारपण लादले जाते की काय अशी आकडेवारी समोर येत असून समाज स्वास्थ्याच्यादृष्टीने ही बाब गंभीर आहे. सज्ञान मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. मात्र जबरदस्तीने बंधनात अडकवून ठेवण्याला कायद्याचा आधार मिळण्याची गरज वाटत असल्याने आम्ही लव्ह जिहाद कायद्याची मागणी करीत आहोत. राज्यात लोकसभेच्या ४५ व विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य असून यासाठी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून राज्यदौरा करीत आहे असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister sanjay rathore maha vikas aghadi govt chitra vagh action the victim girl justice ysh