scorecardresearch

महाविकास आघाडी

२०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांप्रमाणे समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष अशा काही पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन त्यांची २५ वर्षांची युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसामध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar)बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुढे त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्ष टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Read More
Yavatmal District Bank will give direction to the unity of Mahavikas Aghadi
यवतमाळ जिल्हा बँकेचा निकाल महाविकास आघाडीच्या एकजुटीला दिशा देणारा

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीने खेचून आणले. हा निकाल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट…

mahavikas aghadi
…तर पोलीस ठाण्यासमोर थाटणार वरळी-मटक्याचे दुकान!

सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या बुलढाणा शहरात खुलेआम अवैधधंदे सुरू असून गांज्यासारख्या मादक व घातक पदार्थांची सर्रास विक्री होत आहे.

district bank president yavatmal
यवतमाळ : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे मनीष पाटील विजयी, भाजपा-शिंदे-पवार गटाच्या उमेदवारास केवळ सहा मते

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनिष उत्तमराव पाटील विजयी झाले आहेत.

housing department's proposal cancel MHADA decision curbs stock of houses mumbai
घरांचा साठा रोखणारा ‘म्हाडा’ निर्णय रद्द करण्याचा गृहनिर्माण विभागाचा प्रस्ताव

निर्णय रद्द करण्याबाबत गृहनिर्माण विभागाकडून पाठपुरावा केला जाणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule nagpur
“पवार, ठाकरे यांनीच मराठा आरक्षणाला…” चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इतिहास’ सांगितला

मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी जबाबदार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

chitra wagh
“जालना लाठीचार्जसारख्या संवेदनशील मुद्याचे राजकारण करून….” चित्रा वाघ यांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाल्या…

सरकार मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेत असताना जालनामध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले…

Ambedkari power
आंबेडकरी शक्तीला वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! प्रीमियम स्टोरी

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. आजवरचा इतिहास पाहता आंबेडकरी राजकीय शक्ती सोबत असल्याशिवाय…

maha vikas aghadi leaders in india press conference
आमची लढाई हुकूमशाहीविरोधात! शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांचा सूर

आम्ही वेगवेगळय़ा विचारांचे असलो तरी हुकूमशाही रोखण्यासाठी देशप्रेमी पक्ष एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Sharad Pawar on MVA
“…आम्ही तिथे नसतो”, इंडिया आघाडीतल्या प्रवेशावर राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात होतं.

uddhav thackeray and sharad pawar
9 Photos
“मी उद्या जातो अन् पंतप्रधानपदाची शपथ घेतो”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ मागणीवर उद्धव ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य

उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकून पत्रकार परिषदेच एकच हशा पिकला.

india alliance
“आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक पर्याय, पण…”, उद्धव ठाकरेंचं विधान; म्हणाले, “बजरंगबली…”

इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आला नाही, ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×