कर्नाटक सीमेत काही संघटनांनी घातलेल्या धुमाकुळाचा जिल्ह्यात निषेध करण्यात आला. बुलढाणानजीक कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी आज, बुधवारी जोडे मारले.बेळगावजवळील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ला करण्यात आला. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला आहे.
हेही वाचा >>>“नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी
कायदेशीर लढाई आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. बुलढाण्यात तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार आणि जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा तालुका अध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, आशीष गायके, आकाश हुडेकर, शाकीर शहा, गोपाल गिरी, दर्पणसिंग ठाकूर, गणेश पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.