अलिबाग: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अनेक वाहने एकमेकांवर धडकली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या मार्गीकेवर खोपोली हद्दीत तीव्र उतारावर अनेक वाहने एकमेकांना धडकली. ज्यामध्ये तीन कार तीन बसेस आणि एका ट्रकचा समावेश होता. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले.

अश्विनी हळदणकर आणि श्रेया अवताडे अशी अपघातात मरण पावलेल्या महिलांची नावे आहेत. तर वसुधा जाधव, रसिका अवताडे, सारिका जाधव, अविनाश जाधव, आणि अक्षय हळदणकर अशी अपघातातील जखमींची नावे आहेत या सर्वांवर खोपोली आणि कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस आय आर बी यंत्रणा, देवदूत यंत्रणा, खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनची पथक घटनास्थळी दाखल झाली त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अपघातामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू