स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्यात आलं. संबंधित तैलचित्राचं अनावरण करण्यासाठी विधानभवनात सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या सरकारी कार्यक्रमात सरकारच्यावतीने अनेक नेत्यांनी भाषणं केली. पण या कार्यक्रमात एक विचित्र प्रकार घडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी भर कार्यक्रमात हुज्जत घातली. नारायण राणे यांच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. तसेच भाषण थांबवण्याची विनंती केली होती. पण नारायण राणेंनी भाषण थांबवण्यास नकार दिला. मी बसून बोलणाऱ्या लोकांचं ऐकत नाही, असं उलट उत्तर राणेंनी दिलं. यावेळी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा- “…अन्यथा स्वत:चा पक्ष काढण्याची हिंमतच झाली नसती”, बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना राज ठाकरेंचं विधान!

नेमकं काय घडलं?

खरं तर, नारायण राणेंचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर निघाले. यावेळी राणेंनी त्यांना अडवलं, त्याचवेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. यावर राणे म्हणाले कि, भुजबळांचं मला समर्थन आहे, म्हणूनच त्यांनी हात दाखवला. नारायण राणेंच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणामुळे टीकेचा सूर उमटत असताना नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सभापती नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितलं. यावर “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो” असं राणेंनी उत्तर दिलं.

हेही वाचा- “दुसऱ्यांचे वडील चोरताय, पण स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर…” PM मोदी, पवारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल!

यानंतर नीलम गोऱ्हे यांनी भाषण थांबवण्याचा इशारा केला. पण राणेंनी ‘मी नाही थांबणार’ असं म्हटलं. यावर नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेंकरांना विचारलं की, हे काय चाललंय ? किती वेळ चालणार? यानंतर राणेंनी आपल्या भाषणाला ब्रेक लाव