१० एप्रिल १९६२ रोजी मुंबईत जन्मलेले नारायण तातू राणे (Narayan Rane) हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि ते केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी १९९९ मध्ये अल्प कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते आणि ते महाराष्ट्र सरकारमध्ये उद्योग, बंदर, रोजगार आणि स्वयंरोजगार खात्याचे कॅबिनेट मंत्री देखील होते.
त्यांचे लग्न नीलम राणे (Nilam Rane)यांच्याशी झाले असून त्यांना निलेश (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) अशी दोन मुले आहेत. नारायण राणेंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेचे (shivsena) सदस्य म्हणून केली आणि २००५ मध्ये ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मध्ये सामील झाले. राणे यांनी २०१७ मध्ये काँग्रेस सोडली आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला. आपल्या राजकीय कारकिर्दीत पुढे जाताना त्यांनी २०१८ मध्ये भाजपाला (BJP) पाठिंबा जाहीर केला.
१५ ऑक्टोबर २०१९ रोजी राणे भाजपामध्ये दाखल झाले आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही त्यात विलीन झाला.
२४ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारण्याच्या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती.
कोकणातील केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सातारा दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या नैतिकतेच्या मुद्द्यांवरून पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला.…
Aaditya Thackeray Statement about Shivsena Splitting: नारायण राणे म्हणतात, “एखादा रोजगार जर असेल त्यांच्याकडे तर संजय राऊतांनाच द्यायला सांगा. त्यांच्याकडे…