मुलगा निलेश राणे याचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी निलेशचा पराभव झाला तर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला असल्याचे सांगताना राणेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मतदारांवरही आगपाखड केली आहे. कोकणातील जनतेसाठी गेल्या २५ वर्षांपासून आपण खूप काम केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला असून, यापुढे कोकणात सुरू असलेले सर्व उपक्रम आपण थांबविणार असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
मुलाचा संभाव्य पराभव नारायण राणेंच्या जिव्हारी; मंत्रिपदाचा राजीनामा
मुलगा निलेश राणे याचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

First published on: 16-05-2014 at 01:01 IST
TOPICSनारायण राणेNarayan Raneलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane will possibly resign today