इस्लामपूर शहरातील स्वच्छतेचा पुरा बोजवारा उडाला असून साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहे. शहरातील पिण्याचे पाणी, वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी, घरकुल योजनेचा परवाना,भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आदी विविध नागरी सुविधा व मागण्या येत्या ८ दिवसात पूर्ण करा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा मंगळवारी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला.

नागरी प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.  यावेळी प्रशासक वैभव साबळे यांना निवेदन देण्यात आले. शहराच्या मुख्य मार्गावरून येत इस्लामपूर नगरपालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील खदखद चव्हाट्यावर? उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण

माजी नगराध्यक्ष अँड.चिमन डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील,दादासो पाटील, खंडेराव जाधव,पै.भगवान पाटील,आनंदराव मलगुंडे,महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील,संदीप पाटील,विश्वनाथ डांगे,अरुण कांबळे,शंकरराव पाटील,युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे,युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून भव्य मोर्चाची सुरुवात झाली. यल्लाम्मा चौक,गांधी चौक,गणेश मंडई,आझाद चौक,संभाजी चौक,गांधी चौक, कचेरी चौकातून नगरपालिकेवर भव्य मोर्चाने धडक देण्यात आली. शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असतानाही बिले कशी निघतात? असा सवाल चिमण डांगे यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठा व स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. ३ कोटी २७ लाखाचे टेंडर रद्द का केले?  अशी विचारणा शहाजी पाटील यांनी केली. प्रा.शामराव पाटील,सुभाषराव सुर्यवंशी, अँड.धैर्यशील पाटील,विश्वासराव पाटील, शंकरराव चव्हाण,माजी नगराध्यक्ष वाय.एस. जाधव,अँड.संपतराव पाटील, संजयकाका पाटील,संचालक शैलेश पाटील,राजकुमार पाटील,रतनशेठ रायगांधी, मानसिंग पाटील,जयश्री पाटील,सुनीता सपकाळ, शुभांगी शेळके,प्रतिभा पाटील,योगिता माळी,गोपाळ नागे,विलास भिंगार्डे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.