Jitendra Awhad MLA Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३५४ कलमांतर्गत आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. तसे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘ती’ चित्रफीत प्रसारित करत खोटा गुन्हा नोंदविला; जितेंद्र आव्हाड यांची समाजमाध्यमांवरील पोस्ट चर्चेत

जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटमध्ये काय आहे?

“पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हे दाखल केले. यातील एक गुन्हा हा ३५४ कलमांतर्गत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही,” असे जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

हेही वाचा >>>मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना विवियाना मॉल मारहाणप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोणते दोन गुन्हे दाखल ?

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. हाच मुद्दा घेऊन त्यांनी ठाण्यात या चित्रपटाचे शो बंद पाडले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना अटकही करण्यात आली होती. यासोबतच आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मागील साधारण ३ दिवसांमध्ये आव्हाड यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कारणामुळे ७२ तासांत माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल केले, म्हणत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे ट्वीटद्वारे जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad going to give resignation of mla post prd