"जेव्हा खरी गोष्ट समोर येईल, तेव्हा..." एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया | ncp leader rohit pawar statement on speculation of eknath khadse will join BJP ahmednagar rmm 97 | Loksatta

“जेव्हा खरी गोष्ट समोर येईल, तेव्हा…” एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

“जेव्हा खरी गोष्ट समोर येईल, तेव्हा…” एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
संग्रहित फोटो

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेल्याचीही चर्चा आहे. सुमारे तीन तास अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर बसल्यानंतर शाहांनी खडसेंची भेट नाकारली असा गौप्यस्फोट भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथ खडसे प्रतीक्षा करत बसले होते, याची काही माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हालाही द्या. केवळ चर्चांवरच आपण बातम्या करणार असू आणि चर्चेवरच राजकारण करणार असू तर यातून कुणालाही काही मिळणार नाही, जेव्हा हे घडेल तेव्हा त्यावर बोलता येईल” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “बारामतीचा शरद पवार नावाचा माणूस…” एकेरी उल्लेख करत गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!

पुढे रोहित पवार म्हणाले, सध्या राज्यात चर्चेला अनेक गोष्टी आहेत. पण त्यांच्या जिल्ह्यात दोन शक्तीस्थान असल्यामुळे कदाचित लोकांचं मन विचलित व्हावं, यासाठी महाजनांनी संबंधित वक्तव्य केलं असेल. त्यामध्ये काही तथ्यही नसेल. त्यामुळे उगीच ज्या गोष्टी खऱ्या नाहीत, त्यावर वेळ कशाला घालवायचा, असंही पवार म्हणाले.

हेही वाचा- खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाहांनी भेट नाकारली? गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ खडसे भाजपात जाणार आहेत, अशी चर्चा आहे, यावर तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “आहो, ती चर्चाच आहे ना… आणि चर्चाच राहणार आहे. चर्चांवर राजकारण आणि बातम्या करता करता आपण सगळेजण थकून जाऊ इतक्या चर्चा आज महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे अशा चर्चांवर वेळ न घालवता, जेव्हा खरी गोष्टी समोर येईल, तेव्हा आपण यावर वक्तव्य करू”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“अजित पवारांना सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत, पण ते…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना खोचक टोला

संबंधित बातम्या

जुळ्या बहिणींशी विवाह करणं पडलं महाग; दुसऱ्याच दिवशी नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल
यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १३ प्रवासी गंभीर जखमी
“पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”
‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’ वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी; म्हणाले…
गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हातामागावरील साडीपेक्षाही पाठकबाईंची ओढणी ठरली लक्षवेधी, लिहिला आहे खास संदेश
युरिक ॲसिड वाढल्याने किडनी फेल होऊ शकते, ‘हे’ पदार्थ खाणे आजपासूनच सोडा
Video: अक्षया-हार्दिकच्या लग्नानंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा-पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मिरजेत ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनामत रकमेवर डल्ला; अज्ञात चोराविरोधात तक्रार दाखल
राणा दग्गुबाती भारतातील प्रसिद्ध विमान कंपनीवर संतापला; ट्वीट करत म्हणाला…