एकतर्फी प्रेमातून गोळीबार करून तरुणास ठार करणा-या गुन्ह्यातील आरोपी पोपट गायकवाड यास मंगळवारी पन्हाळा पोलिसांनी अटक केली.
पोपट याचे शेजारी राहणा-या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. या तरुणीचा विवाह सूर्यदीप राजाराम पाटील या युवकाशी झाला होता. १३ जून रोजी पोपट हा संबंधित तरुणीस बळजबरीने आपल्या घरी घेऊन जात होता. त्यातून वादावादी झाली. संतप्त पोपट गायकवाडने सूर्यदीप याच्या छातीत गोळय़ा घालून खून केला होता. त्यानंतर तो फरारी होता. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली होती. मंगळवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास केएमटी बसमधून खांद्याला रायफल लावलेल्या अवस्थेत उतरत असताना पोलिसांना आढळला. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी करून त्याला ताब्यात घेतले. त्यावर पोपटने सूर्यदीपचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. गुन्ह्यात वापरलेल्या रायफलसह पोपटला सपोनि अनिल देशमुख यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पन्हाळा पोलिसांकडे स्वाधीन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2014 रोजी प्रकाशित
एकतर्फी प्रेमातून हल्ला करणा-यास अटक
एकतर्फी प्रेमातून गोळीबार करून तरुणास ठार करणा-या गुन्ह्यातील आरोपी पोपट गायकवाड यास मंगळवारी पन्हाळा पोलिसांनी अटक केली.
First published on: 18-06-2014 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One arrested in case of attack