बांगलादेशकडून आयात करात वाढ; उत्पन्न जेमतेमच
नागपुरी संत्र्याचा मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने वाढविलेला आयात कर व मृग बहाराच्या वाढीव उत्पादनाने संत्रा उत्पादकांच्या पदरी यंदा थोडी निराशाच आली. विदर्भातील नागपुरी संत्री म्हणून ओळख असलेल्या संत्र्याला बांगलादेश व श्रीलंकेत मोठी मागणी आहे. दीड ते दोन लाख टन संत्रा देशाबाहेरील संत्राप्रेमी फस्त करतात.
यंदा आंबिया बहारापेक्षा मृग बहार चांगलाच फ ळला. ३० मार्चपर्यंत तोड झाली. अमरावती, नागपूर व वर्धा अशा उत्पादनात प्रथम तीन क्रमांकांवर असणाऱ्या जिल्ह्य़ांतून तीन ते साडेतीन लाख टन संत्री बाजारात आली. प्रतवारीनुसार, १५ ते २५ हजार रुपये प्रति टन असा भाव मिळाला. पण आपल्याकडे ज्याप्रमाणे कापूस व साखरेच्या आयात व निर्यातदराचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी कळीचा ठरतो तसाच बांगलादेशच्या संत्रा उत्पादकांना कळीचा वाटला. पाच वर्षांपूर्वी २० टनाची पेटी आयात करासह ४० हजार रुपयांत पडत होती. तीन वर्षांपूर्वी हा दर तीन लाखांवर पोहोचला. यावर्षी २० टनाच्या पेटीसाठी व्यापाऱ्यांना ५ लाख ४० हजार रुपये मोजावे लागले.
उभय देशात विविध शेतमालाच्या देवाणघेवाणीतून हे शक्य होऊ शकते, असे निदर्शनास आणत श्रीधर ठाकरे म्हणाले, मृगाचे उत्पादन या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी बरोबरीतच सुटले. आंबिया बहारात डिसेंबपर्यंत ३० ते ४० हजार टन किंमत होती. कमीतकमी २५ हजारांवर ती थांबली. त्या वेळी थोडा नोटाबंदीचाही फ टका बसला, मात्र वर्षभरापूर्वी पाच हजार रुपये टन अशा मातीमोल भावाने संत्री विकावी लागण्याच्या पाश्र्वभूमीवर यावर्षी आंबिया व मृग असे दोन्ही हंगाम समाधानकारकच राहिले. फ क्त घसघशीत उत्पन्न साधले नाही. नागपुरात १२ ते १८, वरूड १५ ते २५ व कारंजा २५ ते ३० हजार रुपये टन असा वेगवेगळा दर राहल्याची माहिती मिळाली. कारंजा संत्रामंडीत संत्रा उत्पादक संघटनेने दिल्लीस्थित कंपनीशी करार केल्याने ते चांगल्याच फोयद्यात राहिले. विदर्भात सर्वाधिक नफो याच परिसरातील संत्रा उत्पादकांनी कमावल्याचे दिसून आले.
तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने पारंपरिक पद्धतीनेच संत्रा उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. एकूण संत्रा उत्पादनात ३० टक्के संत्राफ ळ हे लहान आकाराचे असते. ते फे कूनच द्यावे लागते. दुसरी बाब म्हणजे अशा लहान आकाराच्या संत्र्यांची भर पडल्याने संत्र्यांचा दर्जा दिसत नाही.
एका संत्राबागेत एक हजारपैकी सातशे संत्रीच रसदार व मोठय़ा आकाराची निघू शकतात. त्यासाठी एका झाडावरील ३०० लहान संत्र्यांची तोड प्रारंभीच केली तर उर्वरित संत्री बाजारपेठेस अपेक्षित अशी मिळतात.
द्राक्षाला परदेशात मोठी मागणी आहे. नाशिक, पुणे परिसरात परदेशात निर्यात करण्यास अपेक्षित अशी द्राक्षे पिकविली जातात. दहा शेतकऱ्यांचा एक गट इंग्लंडच्या अपेक्षेनुसार, तर दुसऱ्या दहा शेतकऱ्यांचा गट फ्रोन्सला अपेक्षित द्राक्षे पुरवितो. संत्र्यांच्या चवीचेही तसेच आहे. आकार, चव व रंगरूप अशा तीन पैलूने संत्र्याची बाजारपेठ ठरते.
पंजाबचा संत्रा देखणेपणानेच नागपुरी संत्र्यावर यावर्षी मात करणारा ठरला, असे श्रीधर ठाकरे निदर्शनास आणतात. त्यासाठी तंत्रज्ञान गावपातळीवर पोहोचणे गरजेचे आहे. संत्र्यासाठी पोषक हवामान व जमीन विदर्भात आहे. फ क्त नव्या तंत्रज्ञानाने हे फ ळ पिकविल्यास चांगली किंमत मिळू शकेल. जगभर बाजारपेठ असणाऱ्या लोकप्रिय संत्र्यांची मागणी विदर्भातील तीनच जिल्हे पुरवू शकतात. चांगले कलम, निगा व साठवण क्षमता या पातळीवर शासकीय सहकार्य अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया मिळते.
बांगलादेशात हा संत्रा महागला. परिणामी आवक मंदावली. ४० टक्क्याने संत्रीनिर्यात घसरल्याचा आकडा संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक श्रीधर ठाकरे हे देतात. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले. केंद्रीय व्यापारमंत्र्यांच्या मार्फ त बांगलादेशाने आयातकर कमी करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संत्र्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते, पण तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने पारंपरिक पद्धतीनेच संत्रा उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.
- एकूण संत्रा उत्पादनात ३० टक्के संत्राफ ळ हे लहान आकाराचे असते. ते फे कूनच द्यावे लागते.
- दुसरी बाब म्हणजे अशा लहान आकाराच्या संत्र्यांची भर पडल्याने संत्र्यांचा दर्जा दिसत नाही. एका संत्राबागेत एक हजारपैकी सातशे संत्रीच रसदार व मोठय़ा आकाराची निघू शकतात.
- त्यासाठी एका झाडावरील ३०० लहान संत्र्यांची तोड प्रारंभीच केली तर उर्वरित संत्री बाजारपेठेस अपेक्षित अशी मिळतात.