Petrol Diesel Prices : पेट्रोल व डिझेलच्या किंमती म्हणजे नागरिकांसाठी अगदीच जिव्हाळ्याचा विषय. इंधनाच्या किंमतीत वाढ आणि थेट महिन्याच्या बजेटवर परिणाम असे चित्र दिसून येते. त्यामुळे सामान्य नागरिक कधी पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी होतात याची आतुरतेने वाट पाहत असतो. तर आज सकाळी ६ वाजता इंधनाचे नवे दर जाहीर झाले आहेत. तर आज २ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे हे प्रत्येकाने खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्यावा. महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.२४९०.७७अकोला१०४.६५९१.१९अमरावती१०५.०६९१.५९औरंगाबाद१०५.३१९१.८०भंडारा१०५.०८९१.६१बीड१०५.८९९२.३७बुलढाणा१०४.४६९१.०१चंद्रपूर१०४.४०९०.९६धुळे१०३.९६९०.५०गडचिरोली१०५.४३९१.९४गोंदिया१०५.५६९२.०६हिंगोली१०५.३५९१.८९जळगाव१०४.१४९१.६४जालना१०५.९४९२.४०कोल्हापूर१०४.८२९१.३६लातूर१०५.३६९१.८६मुंबई शहर१०३.४४८९.९७नागपूर१०३.९८९०.५४नांदेड१०६.३२९२.८१नंदुरबार१०५.४३९१.९२नाशिक१०४.९१९१.४१उस्मानाबाद१०५.२८९१.७९पालघर१०४.८६९१.३३परभणी१०६.६८९३.१३पुणे१०३.८९९०.४३रायगड१०४.७२९१.२०रत्नागिरी१०५.९३९२.४२सांगली१०४.२०९०.७५सातारा१०५.०१९१.५०सिंधुदुर्ग१०५.४७९१.९७सोलापूर१०४.५१९१.०४ठाणे१०३.७४९०.२५वर्धा१०४.११९०.६७वाशिम१०४.८३९१.३६यवतमाळ१०५.६२९२.१३ महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळाला आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, नाशिक, उस्मानाबाद, सातारामध्ये पेट्रोलची दरवाढ झालेली पाहायला मिळते आहे. तर नागपूरात पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच अकोला, बीड, जळगाव, कोल्हापूर , पालघर या शहरांमध्ये डिझेलच्या किंमती किंचित वाढ झालेली दिसते आहे. तर सिंधुदुर्गात डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महिन्याच्या दुसऱ्या दिवशीचे पेट्रोल व डिझेलचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना खिशाला कात्री बसणार आहे. कारण - पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत बऱ्याच ठिकाणी दरवाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेदररोज बदलल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असतात. एसएमएसद्वारे जाणून घ्या दर : तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो. तर तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर नक्की तपासून घ्या .