prakash mahajan attacks dhananjay munde over pankaja munde relationship statement ssa 97 | Loksatta

“पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका

Prakash Mahajan On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंसोबतची नातं संपल्याचं सांगितलं होते. त्यावरून प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे.

“पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका
धनंजय मुंडे प्रकाश महाजन ( फोटो – संग्रहित )

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहीण पंकजा मुंडे यांच्याशी असणाऱ्या नात्यात दुरावा आल्याची कबुली दिली होती. आमचं नातं आता बहीण भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत, असे त्यांनी सांगितलं होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी समाचार घेत धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

प्रकाश महाजन ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. “धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं नातं संपायला नाही पाहिजे. पंकजा मुंडेंनी नातं संपलं, असं जाहीर केलं नाही. राजकीय लढाई वेगळी असते. २०१९ साली बीडमध्ये धनंजय मुंडे आपल्या बहिणीबाबत काय काय बोलले हे आठवा. धनंजय मुंडेंना गोपींनाथ मुंडे आणि प्रकाश महाजनांमुळे ओळख मिळाली,” असेही प्रकाश महाजन यांनी म्हटलं.

हेही वाचा – मुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा? धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”

“पत्नीच्या कारमध्ये बंदूक ठेवून अटक…”

“धनंजय मुंडेंना ज्या स्त्रीपासून दोन मुले आहेत, तिला कशी वागणूक दिली. परळीत आल्यावर आपल्या पत्नीच्या कारमध्ये बंदूक ठेवून अटक करण्यास सांगतो. त्यांच्या दृष्टीने नात्याला काही किंमत नसते, अशी काही लोक असतात. पण, नाते जोपासले पाहिजे,” असेही प्रकाश महाजन म्हणाले.

हेही वाचा – “…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

“जिथे स्वार्थ आडवा येतो…”

“पंकजा मुंडेंच्या आईस गॉड मदर म्हणणारे धनंजय मुंडे तिच्याबाबत, असं कसे बोलू शकतात. नात्यात ऐवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. नात जोपण्यासाठी भावना असावी लागते. जिथे स्वार्थ आडवा येतो, संस्कार होत नाही, तिथे अशी वक्तव्य होतात,” असा निशाणा प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंवर साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”

संबंधित बातम्या

“असे आक्रित इंग्रज काळातही घडले नाही, काळ मोठा…”, संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधानांचाही केला उल्लेख!
जयंत पाटलांच्या चिरंजीवांच्या शाही विवाहाची लगबग! ; दोन लाख लग्नपत्रिका; अतिभव्य मंडप
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, नवनीत राणा म्हणाल्या, “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”
“ज्या माणसाने दारू पिऊन…” शरद पवारांशी संबंधित घटनेचा उल्लेख करत आव्हाडांची सदावर्तेंवर जोरदार टीका!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूकीत बदल
FIFA World Cup 2022: “माझ्या बालपणीचे स्वप्न…” रॉबर्ट लेवांडोस्कीने पोलंडच्या विजयानंतर व्यक्त केल्या भावना
“तिचे फोटो लोक रात्री बिछान्यात…” चेतन भगत यांचं उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्य
पुणे: हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याच्या संचालकांना दिल्ली पोलिसांची नोटिस
वाढलेले युरिक अ‍ॅसिड ठरू शकते संधिवाताचे कारण, कमी करण्यासाठी करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय