महाराष्ट्रात गारपिटीनंतर पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यासाठी काय केले? असा सवाल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला.
लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील गायकवाड यांच्या प्रचारार्थ क्रीडासंकुलावर आयोजित सभेत मोदी बोलत होते. भाजप नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, विनायक मेटे, गोिवद केंद्रे, आदी उपस्थित होते. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, लोकांच्या डोळय़ात धूळफेक करण्याचे काम काँग्रेसची मंडळी आजवर करीत आली आहेत. धुळफेकीनंतर थोडे बहुत दिसत असावे, म्हणूनच संसदेत मिर्ची पूड डोळय़ात टाकली जात असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली. राज्यातील व देशातील सरकार असंवेदनशील असून बॉम्बस्फोट बिहारमध्ये झाल्यानंतर देशाचे गृहमंत्री नट- नटय़ांसोबत मुंबईत चित्रपटाचे लाँचिंग करण्यात मग्न होते, असा टोलाही लगावला.
लातूर परिसरात तूर डाळीचे उत्पादन होते. एकेकाळी अकराशे कोटींची तूरडाळ निर्यात होत होती. आता ११ हजार कोटींची तूरडाळ आयात केली जात आहे. असे असेल, तर येथील शेतकरी आíथकदृष्टय़ा कसा सक्षम होईल? असा सवाल त्यांनी केला. बेरोजगारी, महिला सुरक्षा, पिण्याचे पाणी असे कोणतेही प्रश्न उपस्थित केले तर काँग्रेसकडे त्याला उत्तर नाही. केवळ जुनेच आरोप माझ्यावर करीत आहेत. देशात पहिल्यांदाच विरोधी पक्षातील मंडळींची भीती दाखवत सर्वजण एकत्र येत आहेत. मात्र, परिवर्तन करण्याचा निर्णय जनतेने घेतला असल्यामुळे देशात भाजपचे मजबूत सरकार येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
‘चार खांदेकरी’!
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महायुतीच्या पाच पांडवांमध्ये आता सहावा सामील झाला आहे. त्यामुळे आता नाव काय घेणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मुंडे म्हणाले की, चारजण तुम्हाला खांदा देण्यासाठी, एकजण पुढे िशकाळे धरण्यासाठी व एकजण िशकाळे धरणाऱ्यांना आधार देण्यासाठी राहणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नामोनिशाण मिटणार आहे, असा टोला त्यांनी लगावला.