अहिल्यानगर : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकासासाठी ४३ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजना महायुती सरकारने जाहीर केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सरकारने सर्व जिल्ह्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १४९ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र विकासातून पर्यटन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. या कामांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावाना निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगमनेरमधीर बिरोबा महाराज देवस्थान (तळेगाव दोघे) परिसर सुधारणा व सुशोभिकरणसाठी ४९२ लाख रु., नेमबाई मंदिर (ओझर खुर्द) सुशोभिकरण २५ लाख, निंबाळे येथील मोठेबाबा मंदिर (मच्छिंद्रनाथ मंदिर) सुशोभिकरण २५ लाख, अंभोरे येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर सुशोभिकरण १४.६ लाख, कोल्हेवाडी येथील काशी विश्वेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण २५ लाख रु, धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर सुशोभिकरण १९.८ लाख व श्री बिरोबा देवस्थान सुशोभिकरण १५ लाख, साकूर येथील श्री विरभद्र देवस्थान परिसर सुशोभीकरण ५० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. श्रीरामपूरमधील सरला बेट येथील गंगागिरी महाराज संस्थानच्या विकास कामांसाठी ४९८ लाख, उंदिरगाव ते श्री क्षेत्र सरलाबेट या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण ५०० लाख मंजूर करण्यात आले.

जामखेड तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकास कामांसाठी ४१३ लाख, श्री. क्षेत्र खर्डा येथील श्री. सितारामबाबा देवस्थान मंदीर सभामंडप व महंत सभा मंडपासाठी ३०० लाख, पारनेर तालुक्यातील निघोज येथे मळगंगा देवी परिसरात पर्यटन विसावा केंद्र बांधकामास २५० लाख, मळगंगा देवी परिसरात पर्यटन भोजन कक्ष व संरक्षण भिंत बांधकामास १३० लाख, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ ते मंदिर कुंड रस्ता कॉक्रीटीकरणास ६५ लाख, निघोज येथील मंळगंगा देवी परिसर सुशोभिकरण ५५ लाख मंजूर झाला आहे. पाथर्डीतील चिंचपूर येथील श्रीक्षेत्र दर्शन मंदिर परिसर सुशोभिकरण व सभामंडप ४०.६६ लाख, श्री क्षेत्र मोहटादेवी जगदंबा माता येथील घाट दुरुस्तीसह सुधारणा काम २०० लाख, घाटशिरस येथील वृध्देश्वर देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरण ४९.९९ लाख, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर सुशोभिकरण १५०.४९ लाख रूपये उपलब्ध होणार आहेत.

श्री क्षेत्र मढी ते तिसगांव रस्त्याच्या कामासाठी ३४० लाख, मोहटादेवी येथे ध्यान धारणा केंद्र व बहुउद्देशिय सभागृहासाठी ५५.२२ लाख, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिर सुशोभिकरण ४९.९९ लाख व राहुरीतील कणगर येथील कनकावती माता मंदीर सभामंडपसाठी ३५ लाख, म्हैसगाव येथील केदारेश्वर महादेव मंदीर सभामंडपासाठी २० लाख, राहुरी बुद्रुक येथील खंडोबा महाराज मंदीर सुशोभिकरण २० लाख, ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबा माता देवस्थान सुशोभिकरणास ४९.६६ लाख तसेच अकोल्यातील निंब्रळ येथील अंबिका माता देवस्थान ट्रस्ट येथे सुशोभीकरणास २०० लाख, कोतुळ येथील कोतुळेश्वर महादेव मंदीर विकासकामांसाठी १५० लाख तर शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील गणपती मंदीर सभामंडपासाठी ५० लाख मंजूर झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil announced rs 43 crore 6 lakh for pilgrimage site development under regional tourism scheme sud 02