दापोली – आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिक वरून मंडणगड कडे येणाऱ्या वॅगनआर (गाडी क्रमांक एम.एच.०८ एएक्स ९५८९) कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिरगाव येथे अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.
या अपघातात शंकर करमरकर (वय ४६) मुक्काम राजापूर देहेण (सध्या वास्तव्य दापोली), हर्षदा जोशी ( वय ७०) राहणार टिळक आळी रत्नागिरी या दोघांचा जागेवरच दुर्देवी मृत्यू झाला. अपघातात गाडीतून प्रवास करणारे प्रमोद मुकुंद लिमये (वय ६५) आणि ओंकार प्रमोद लिमये (वय ३५) दोघेही राहणार मुक्काम केळशी तालुका दापोली यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता भिंगळोली ग्रामिण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
घटनेची माहीती कळताच माहिती मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुन पुढील प्रक्रीया सुरु केली. अपघातात जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारांकरिता पुढे पाठविण्यात आल्याची माहीती मिळाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास रस्त्यावरून गाडी बाजूच्या गटारात पलटी होऊन हा अपघात झाला व त्यामध्ये गाडीतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे. अपघाताचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.
