राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन, तब्बल पाच कोटी रुपायांची खंडणी मागून ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस इंदूर येथूनअटक करण्यात आली आहे. आता मुंबई पोलीस रेणू शर्माला मुंबईत आणणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेणू शर्माला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागीतल्याची आणि ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली होती. या संबंधी मलबार हील पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मागील दीड-दोन वर्षांपासून मला हा त्रास सुरू होता, असं त्यांनी सांगितलं आहे.

परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप तसेच फोन करून पैशांची मागणी –

तथाकथित रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे पोलिसात दिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

मंत्रीपद वाचवायचं असेल तर दहा कोटी काय फार मोठी गोष्ट नाही –

”मागील वर्षी एक कागद सोशल मीडियावर टाकला तर तुमचं मंत्रीपद धोक्यात आलं होतं. आता तर जर माझी मागणी पूर्ण केली नाही तर मी तुम्हाला बदनाम करेन. जर मंत्रीपद वाचवायचं असेल तर, दहा कोटी कोणती मोठी गोष्ट आहे?” अशा आशयाचा मेसेज ही महिला पाठवत असून, याद्वारे पाच कोटी रुपये कॅश आणि पाच कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी करत असल्याचं धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं होतं.

मुंबई क्राईम ब्रँच व इंदूर पोलिसांची संयुक्त कारवाई –

सदर रेणू शर्मा ही महिला मूळ इंदूर, मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून काल(बुधवार) इंदूर कोर्टात हजर केले होते, इंदुर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज (शुक्रवार) रोजी सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अनेकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी –

या रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनी देखील ब्लॅकमेलिंग संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renu sharma who blackmailed minister dhananjay munde was finally arrested from indore msr