कराड : सामाजिक कार्य, प्रबोधनात अग्रेसर सैदापूर (ता. कराड) येथील रेणुकामाता सांस्कृतिक मंडळ व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामातेच्या मूर्तीसमोरील देखावा म्हणून आयोजित सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच जैवविविधता भित्तीपत्रके प्रदर्शनाला विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोयना व वारणा धरण तसेच कोयना, वारणा, कृष्णा नद्या व पर्यटन केंद्रांविषयी माहिती नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता. मंडळाच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबतची जनजागृती झाली आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समाविष्ट असलेल्या पश्चिम घाटात सन २०१० पासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाघांसह वन्यजीव व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना यश मिळून चांदोली व कोयना अभयारण्यात सध्या तीन वाघांचे वास्तव्य आहे. निसर्गातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेला वाघ हा जैवविविधतेचे प्रतीक असल्याचेही या भित्तीपत्रके प्रदर्शनातून सांगण्यात आले आहे. कोयना व वारणा धरण तसेच कोयना, वारणा, कृष्णा नद्या व पर्यटन केंद्रांविषयी माहिती नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता. मंडळाच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबतची जनजागृती झाली आहे.
रेणुकामाता सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष ओम कन्नूर, सचिन कदम, सुस्मित ठोंबरे व सिद्दिक अत्तार या तरुण पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक सलोखा व ऐक्य वाढवणारे अनेक उपक्रम राबवले आहेत. भित्तीपत्रके प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप, संग्राम गोडसे यांचे नागरिकांनी आभार मानले. प्रदर्शनातील माहिती व छायाचित्रांमुळे विशेषतः शालेय मुलांमध्ये उत्सुकता दिसून आली.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समाविष्ट असलेल्या पश्चिम घाटात सन २०१० पासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाघांसह वन्यजीव व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना यश मिळून चांदोली व कोयना अभयारण्यात सध्या तीन वाघांचे वास्तव्य आहे. निसर्गातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेला वाघ हा जैवविविधतेचे प्रतीक असल्याचेही या भित्तीपत्रके प्रदर्शनातून सांगण्यात आले आहे. या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच जैवविविधता भित्तीपत्रके प्रदर्शनाला विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रेणुकामाता सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष ओम कन्नूर, सचिन कदम, सुस्मित ठोंबरे व सिद्दिक अत्तार या तरुण पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक सलोखा व ऐक्य वाढवणारे अनेक उपक्रम राबवले आहेत.