"हातात तुणतणं घेऊन गावोगावी..." अजित पवारांवरील टीकेनंतर सचिन खरातांचा शहाजीबापू पाटलांना टोला | RPI kharat chief sachin kharat on rebel mla shahajibapu patil statement on ajit pawar rmm 97 | Loksatta

“हातात तुणतणं घेऊन गावोगावी…” अजित पवारांवरील टीकेनंतर सचिन खरातांचा शहाजीबापू पाटलांना टोला

अजित पवार यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकावं, असा खोचक सल्ला शहाजीबापू पाटलांनी दिला होता. यावरून आता सचिन खरातांनी पलटवार केला आहे.

“हातात तुणतणं घेऊन गावोगावी…” अजित पवारांवरील टीकेनंतर सचिन खरातांचा शहाजीबापू पाटलांना टोला
संग्रहित फोटो

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. अजित पवार यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकावं, असा खोचक सल्ला शहाजीबापू पाटलांनी दिला होता. यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी शहाजीबापू पाटलांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

शहाजी बापू पाटील यांना गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत नाच्या अशी ओळख मिळाली आहे. भविष्यात हातात तुणतुणं घेऊन ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली” हे गाणं म्हणत त्यांना गावोगावी फिरावं लागणार आहे, अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.

हेही वाचा- “अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

संबंधित व्हिडीओत खरात म्हणाले, “शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकण्याचा सल्ला दिला होता. पण शहाजीबापू पाटील तुम्ही ध्यानात ठेवा, गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत तुम्ही नाच्या म्हणून प्रसिद्ध झाला आहात. त्यामुळेच शिंदे गट तुम्हाला प्रत्येक सभेत नाच्या म्हणून बोलावत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. परंतु तुम्ही ज्या सांगोला तालुका विधानसभा मतदार संघाचं नेतृत्व करता, तेथील जनता तुम्हाला लवकरच घरी बसवणार आहे. कारण तुम्ही नाच्या म्हणून प्रसिद्ध झाला आहात.

हेही वाचा- “होय, त्याला फोन केला, पण…” चेंबुरच्या व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

“तुम्ही तुमच्या मतदार संघातील लोकांची काम करायचं सोडून नाच्या म्हणून राज्याभर फिरत आहात. त्यामुळे सांगोल्यातील जनता तुम्हाला लवकरच घरी बसवेल, हे तुम्ही ध्यानात ठेवा. जनतेनं तुम्हाला घरी बसवल्यानंतर, तुम्हाला हातात तुणतुणं घेऊन, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं म्हणत गावोगावी फिरावं लागणार आहे” अशा शब्दांत सचिन खरांतांनी शहाजीबापू पाटलांवर टीकास्र सोडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं असताना मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, म्हणाले, “मी भाग्यवान आहे की…”

संबंधित बातम्या

“लवकरच कठोर पावलं…”, संजय राऊतांचं सूचक विधान, राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण आणखीन तापणार?
‘तर उठाव होणारच!’ राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत संभाजीराजेंचा इशारा, म्हणाले “भावना समजत नसतील तर…”
“ज्या माणसाने दारू पिऊन…” शरद पवारांशी संबंधित घटनेचा उल्लेख करत आव्हाडांची सदावर्तेंवर जोरदार टीका!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
“असे आक्रित इंग्रज काळातही घडले नाही, काळ मोठा…”, संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधानांचाही केला उल्लेख!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अरबाजच्या गर्लफ्रेंडचं मलायका अरोराशी कसं आहे नातं? जॉर्जिया म्हणते, “माझ्यासाठी ती अशी व्यक्ती…”
भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना
“नट विस्मरणात जातो पण…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केला ‘नटसम्राट’मधील व्हिडीओ
राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही
‘महाभारत’मध्ये दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला १३ लाखांचा गंडा; आरोपी पोलिसांच्या ताब्यात