सातारा : राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात गेत यंदाचा सातारचा शाही दसऱ्यातील सोहळ्याचा भाग रद्द करून यातून वाचणारा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर केला आहे. तसेच जनतेने पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही उदयनराजे यांनी केले आहे.

साताऱ्याचा शाही दसरा हा राज्यात प्रसिद्ध आहे. या मध्ये मिरवणुकीसह विविध सासंकृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. याचे नियोजन पूर्ण झाले होते. मात्र राज्यावर ओढवलेले पूरसंकट विचारात घेत उदयनराजे यांनी वरील निर्णय जाहीर केला आहे.

ते म्हणाळे, की राज्यात विशेषकरून मराठवाडा, कोकण, सातारा जिल्ह्यातील पूर्व भागावर अथिवृष्टीने पूरस्थिती उदभवली आहे. वरुणराजाने हाहाकार माजवला आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक संकटात आहे. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा शेतकरी तर उदध्वस्त झाला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी शाही दसरा सारखा सोहळा करणे योग्य वाटत नाही. याचा विचार करूनच यंदाचा सातारचा विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा (दि. २) अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी येमारा खर्चाची बचत करत तो निधी पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात आणि विशेषकरून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जीवित आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा शेतकरी तर उदध्वस्त झाला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सातारचा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धूमधडाक्यात, डामडौलात करणे हे किमान आमच्या मनाला पटणारे नाही. पावसामुळे मराठवाड्यासह राज्यात हाहाकार असताना त्याठिकाणी मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साताऱ्याचा शाही दसरा हा राज्यात प्रसिद्ध आहे. या मध्ये मिरवणुकीसह विविध सासंकृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. याचे नियोजन पूर्ण झाले होते. मात्र राज्यावर ओढवलेले पूरसंकट विचारात घेत उदयनराजे यांनी वरील निर्णय जाहीर केला आहे. जनतेने देखील पूरग्रस्तांसाठी पैसे, धान्य, वस्तू रूपामध्ये जमेल तशी सढळ हाताने मदत करावी. ही मदत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त साहाय्यता निधीमध्ये जमा करता येईल, असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.