सावंतवाडी : वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. ही घटना आज सकाळी कुडाळ तालुक्यातील पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अभ्यास करण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी निवती पोलीस दाखल झाले आहेत. संबंधित डंपर चालकावर कारवाई करण्यात यावी या मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School girl died in accident at kudal pat mrj