लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : मोगलांकडून कैद झाल्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची सुटका करण्याचा एकमेव प्रयत्न शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर झाला. याच शौर्याचा स्मृती दिन मंगळवारी शिराळा येथे साजरा करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांना संगमेडराला बंदी बनवून सरदार मुखर्रब खान औरंगजेब बादशाहकडे घेऊन जात असताना मराठ्यांच्या राजांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न शिराळ्याच्या भुईकोट कि्यावर झाला. र्दुदैवाने तो अयशस्वी ठरला. या लढ्याच्या आठवणी जागविण्यासाठी आजचा कार्यक्रम झाला. त्यात सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी उपस्थितीती लावली. यावेळी त्यांनी मनोगतात येथील शौर्याच्या आठवणी जागवल्या.
आणखी वाचा-पाच महिन्यात कृष्णेचे पाणी मराठवाड्यात, दोन तपाची प्रतीक्षा संपणार: आमदार पाटील
यावेळी माजी जि. प. सदस्य रणधीर नाईक, प्रमुख वक्ते अतुल पाटील, रणजितसिंग नाईक, पृथ्वीसिंग नाईक, मुख्यधिकारी नितीन गाढवे, देवेंद्र पाटील, नामदेव गायकवाड, विलास वाटेगावकर, विनय दिक्षित, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह शहरातील विविध मान्यवर, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले. शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व शिराळा नगरपंचायत मार्फत कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.