राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून चुकीची कामे करु नये. दिवस बदलतात, सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे येत्या काळात आम्ही कधी सत्तेत येऊ हे कोणाला कळणार देखील नाही, अशा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांना टोमणा मारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सरकारी अधिकाऱ्यांवर पवार कुटुंबाचे दवाबतंत्र पहिल्यापासून आहे. यामध्ये काय नवीन नाही. पण, कोणताही अधिकारी या दबावाला बळी पडणार नाही. अजित पवारांना वाटत आपण पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन करू. मात्र, अजित पवारांनी पंधरा वर्षे निवांत रहायचं आहे,” असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.

हेही वाचा – “गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा

“उद्धव ठाकरे फक्त मार्गदर्शन…”

दसरा मेळाव्यासाठी ‘मातोश्री’च्या बाहेर राष्ट्रवादीने बॅनरबाजी केली आहे. त्यावरून विचारले असता शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं की, “शिवतीर्थावर राष्ट्रवादीचा मेळावा आहे. उद्धव ठाकरे फक्त मार्गदर्शन करणार आहे. शिवाजी पार्कवर जमलेली गर्दी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी गोळा केलेली असेल. खरे शिवसैनिक बीकेसी मैदानावर असतील,” अशी खोचक टिप्पणी शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla shahaji bapu patil taunt opposition leader ajit pawar ssa