MLA Yogesh Kadam Car Accident: माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. आमदार कदम मुंबईकडे जात होते, याचवेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार योगेश कदम हे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. ते दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla yogesh kadam car accident on mumbai goa highway ramdas kadam rmm