विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची नियमित सुनावणी पार पडली. सुनावणीच्या पहिल्या सत्रात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रावरुन प्रश्न विचारले. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. त्यावेळी काही प्रश्नांवर सुनील प्रभू अडखळले तर काही प्रश्नांवर उत्तरं देताना नीट लक्षात नाही असं म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पत्राचं नेमकं हे प्रकरण काय?

सुनील प्रभू यांनी प्रतिज्ञापत्रातल्या ५० व्या परिच्छेदात एक पत्र जोडलं आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच विषयी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना प्रश्न विचारले. हे प्रश्न तुम्हीच लिहिलंत का? इंग्रजीत का लिहिलंत? सही तुमचीच आहे का? असे अनेक प्रश्न जेठमलानींनी विचारले. तसंच हे पत्र एकनाथ शिंदेंना मिळालंच नसल्याचा युक्तिवादही जेठमलानी यांनी केला. मात्र सुनील प्रभू यांनी हे खोटं असल्याचं म्हटलं आहे.

काय घडलं आज सुनावणीच्या दरम्यान?

महेश जेठमलानी : दिलीप लांडे यांची सही अनुक्रमांक ३२ च्या समोर आहे का?

सुनील प्रभू: अनुक्रमांक ३२ समोर सही केली आहे.

विधानसभा अध्यक्ष : तुम्ही स्पष्ट उत्तर द्या, तिथे सही आहे मात्र ती लांडे यांचीच आहे का? असा त्यांचा प्रश्न आहे.

सुनील प्रभू : त्यांच्या नावासमोर सही आहे ती त्यांचीच असणार ना?

महेश जेठमलानी: प्रतिज्ञापत्रात ५० व्या परिच्छेदात तुम्ही पत्र जोडलं आहे, त्यावर तुमची सही आहे का?

सुनील प्रभू : होय

महेश जेठमलानी : हे पत्र तुम्ही एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलं आहे का? त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत सांगितला आहे का?

सुनील प्रभू : होय, हे पत्र एकनाथ शिंदेंना उद्देशून आहे. त्याचा मजकूर मराठीत समजावून सांगण्यात आला आहे.

महेश जेठमलानी : आपण कथित पत्र एकनाथ शिंदेंना उद्देशून लिहिलं आहे तर मग ते इंग्रजीत का लिहिलं आहे?

सुनील प्रभू : भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून पत्र इंग्रजीत आहे

महेश जेठमलानी: मराठीत लिहिलेलं पत्र कायदेशीर प्रयोजनासाठी वापरता येणार नाही का?

सुनील प्रभू : नाही, असे म्हणणे चुकीचे होईल. मला वाटलं म्हणून मी इंग्रजीत लिहिलं, कदाचित त्यावेळी मला ज्ञात नव्हतं. आता मला पाहिल्यावर कळलं की मराठीतही लिहिलं असतं तरीही चाललं असतं.

महेश जेठमलानी: आपल्या कोणत्याही पत्रासंदर्भात कायदेशीर बाबी उद्भवतील असे वाटते तेव्हा आपण इंग्रजी भाषेत पत्र लिहिता असे म्हणणं योग्य आहे का?

सुनील प्रभू : हे खोटे आहे.

महेश जेठमलानी : या पत्रासंदर्भात कायदेशीर पेच उद्भवू शकतो असे आपल्याला का वाटले?

सुनील प्रभू : त्यावेळी असा राजकीय पेच निर्माण झाला होता की मला वाटले भविष्यात कायदेशीर पेच उद्भवू शकतो.

महेश जेठमलानी : आपल्याला या पत्राबाबत असं का वाटलं की कायदेशीर पेच उद्भवू शकतो?

सुनील प्रभू : त्यावेळी राजकीय पेच आणि संभ्रम निर्माण झाला होता. त्यातून कायदेशीर पेच निर्माण होतील असे मला वाटले.

महेश जेठमलानी: या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया उद्भवू शकते असे २२ जून २०२२ रोजी आपल्याला पहिल्यांदाच वाटले का?

सुनील प्रभू : यापूर्वी विधीमंडळात असे पेच निर्माण झाले त्यावेळी ते पेच न्यायालयात गेले आणि दाद मागितली गेली. इतिहास तसा होता म्हणून मला वाटले हे बरोबर आहे.

महेश जेठमलानी : इंग्रजीत लिहिलेते हे एकमेव पत्र आहे का?

सुनील प्रभू : नाही

महेश जेठमलानी : या पत्रातली भाषा तुमची स्वतःची आहे का?

सुनील प्रभू : त्यावेळी मला जे आकलन झाले ते मी लिहिले

महेश जेठमलानी : या पत्रातली भाषा आपली स्वतःची आहे का?

सुनील प्रभू : मराठीत जे आकलन झाले, जे मला लिहावेसे वाटले ते मी इंग्रजीत भाषांतर करुन लिहिले.

महेश जेठमलानी : आपण हे पत्र मराठीत कुणाला सांगितले का?

सुनील प्रभू : मला तसे केल्याचं आठवत नाही

महेश जेठमलानी : या पत्राचा मराठी मसुदा आपल्याकडे आहे का?

सुनील प्रभू : आता नाही.

महेश जेठमलानी : आपण मेल केला होता, तेव्हा मराठी मसुदा तयार केला होता का?

सुनील प्रभू : मला ते आठवत नाही.

महेश जेठमलानी : या पत्राच्या आधी किंवा नंतर आपण कधी एकनाथ शिंदे यांना इंग्रजीत पत्र लिहिले आहे का?

सुनील प्रभू : होय लिहिलं आहे.

महेश जेठमलानी : आपण एकनाथ शिंदेंना २१ ते ३० जून २०२२ या कालावधीत इंग्रजी पत्र लिहिलं का?

सुनील प्रभू : होय

महेश जेठमलानी : हे पत्र सोडून इतर कुठलं पत्र लिहिलं का?

सुनील प्रभू : होय लिहिलं आहे.

महेश जेठमलानी : आत्ता ते पत्र आपण सादर करु शकता ?

सुनील प्रभू : रेकॉर्डवर आहे.

महेश जेठमलानी : २२ जून २०२२ चे पत्र एकनाथ शिंदेंना कोणत्या माध्यमातून दिले?

सुनील प्रभू : What’s App च्या माध्यमातून

महेश जेठमलानी : आपण आत्ता यावेळी What’s App मेसेज सादर करु शकता का?

सुनील प्रभू : आता नाही करु शकत

महेश जेठमलानी : उद्या सादर करु शकता का?

सुनील प्रभू : आत्ता मी नेमकं सांगू शकत नाही. प्रयत्न करतो.

महेश जेठमलानी: आपण हा What’s App संदेश फोनमध्ये सेव्ह करुन ठेवला आहे का?

सुनील प्रभू : मला नेमकं आठवत नाही. मी हा मेसेज माझ्या मोबाइलवरुन पाठवला की कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या मोबाइलवरुन पाठवला, म्हणून म्हटलं प्रयत्न करतो.

महेश जेठमलानी : आपण या पत्राची एक प्रत सादर केली आहे. What’s App वर पाठवलेली प्रत मूळ प्रत आहे असे समजायचे का?

सुनील प्रभू : नाही.

महेश जेठमलानी: मग पत्राची मूळ प्रत कुठे आहे?

सुनील प्रभू : ओरिजनल प्रत रेकॉर्डवर आहे.

महेश जेठमलानी : एकनाथ शिंदेंना अशी कोणतीही मूळ प्रत पाठवण्यात आलेली नाही, असे मी आपल्याला सांगतो.

सुनील प्रभू : हे खरं नाही.

ही प्रश्नांची सरबत्ती आणि उत्तरं झाल्यानंतर लंच ब्रेक झाला. त्यानंतर सुनील प्रभूंनी साक्ष बदलली. एकनाथ शिंदे यांना What’s App नाही तर मेलवर पत्र पाठवल्याचं प्रभू यांनी सांगितलं. लंच ब्रेकमध्ये चेक केलं तेव्हा पत्र मेलवरुन पाठवल्याचं समजल्याचं ते म्हणाले. यामुळे साक्ष बदला अशी मागणी सुनील प्रभूंनी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी संमती दिली. त्यानंतर पु्न्हा प्रश्नोत्तरे झाली. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

लंच ब्रेकनंतर काय घडलं?

महेश जेठमलानी: ईमेल तुम्ही स्वतः पाठवला का?

सुनील प्रभू : मी स्वतः नाही, पार्टी ऑफिसचे जोशी आहेत त्यांना मेल करायला सांगितला.

महेश जेठमलानी: प्रश्न क्रमांक १६५ च्या उत्तरात बदल केला आहे. आपण म्हटलात की आपण माहिती घेतली आहे. आपण कुणाकडून ही माहिती घेतली?

सुनील प्रभू : मी माझ्या कार्यालयाकडून माहिती घेतली.

महेश जेठमलानी : आपण ही माहिती व्यक्तिश: कार्यालयात जाऊन घेतली की फोनवरुन घेतली?

सुनील प्रभू : माझ्यासह माझे सहकारी व सहाय्यक होते, त्यांना मी हे विचारले त्यांकडून ही माहिती घेतली.

महेश जेठमलानी: तुम्ही स्वतः मेल केला होता का?

सुनील प्रभू : मी स्वतः नाही, तर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जोशी आहेत. त्यांना मेल करायला सांगितला होता.

महेश जेठमलानी : आपण जोशी यांच्याशी कुठे बोलला ?

सुनील प्रभू : या इमारतीत बोललो

महेश जेठमलानी : म्हणजे जोशी याठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही त्यांना येथे भेटला?

सुनील प्रभू : खाली कार्यालयात, तळमजल्यावर

महेश जेठमलानी : जोशी या इमारतीत होते आणि तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी बोललात ?

सुनील प्रभू : लंच टाइम मध्ये दानवे यांच्या कार्यालयात तळ मजल्यावर त्यांना बोलावले आणि त्यांना विचारलं.

महेश जेठमलानी : तुम्ही त्यांना नेमका कुठला प्रश्न विचारला ?

सुनील प्रभू : मी त्यांना असं विचारलं की एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस मी व्हाट्सअप वर पाठवली असं म्हणालो पण मला आठवत नाहीये आपण त्या दिवशी पाठवलेले मेल पण चेक करा त्यावेळी त्यांना तो मेल आढळला व त्यांनी मला सांगितलं.

महेश जेठमलानी : ज्याअर्थी त्यांना हे ईमेल सापडलेले आहेत, तुम्ही एकाच इमारतीत आहात. तर तुम्ही त्यांना या ईमेलच्या प्रिंट आऊट का सादर करायला सांगितल्या नाहीत.

सुनील प्रभू: मी सांगितले ना तुम्हाला. मी खरं बोललो. मी उद्या तुमच्यासमोर सादर करतो.

महेश जेठमलानी : आमदारांना पत्र आणि पक्षादेश ईमेल ने पाठविण्याची पद्धत केव्हा पासून सुरू झाली हे तुम्ही सांगाल का?

सुनील प्रभू : मला नाही आठवत

महेश जेठमलानी : या पद्धतीबद्दल तुम्हाला कधी समजले?

सुनील प्रभू : जेव्हा मी आमदार झालो तेव्हा

महेश जेठमलानी: प्रभू तुम्ही आमदार कधी झालात?

सुनील प्रभू : २०१४ साली झालो

लोकसभेच्या तुमचा प्रचार पण केला आहे साहेब ( जेठमलानी यांना संबोधून)

अनिल परब यांनीही तुमचा प्रचार केला आहे

जेठमलानी- हो मला माहिती आहे, तेव्हा युती होती

अध्यक्ष (उपहासाने) – म्हणून तर सोपे प्रश्न येत नाही ना

सुनावणीदरम्यान एकच हशा

महेश जेठमलानी – तुम्ही पहिल्यांदा आमदार कधी झालात?

सुनील प्रभू – ह्या टर्मच्या आधी झालो

महेश जेठमलानी : या प्रथेबाबत २०१४ पासून तुम्हाला माहित होतं तर २२ जूनला एकनाथ शिंदे यांना इंग्रजीतून पाठवलेल पत्र ईमेल वरून पाठवलं आहे हे तुम्ही तुमच्या अपत्रता याचिकेत का नाही सांगितलं?

सुनील प्रभू – रेकोर्डवर आहे

महेश जेठमलानी – ब्रेकमध्ये तुम्हाला असं का वाटलं की जोशी यांच्याशी तुम्हाला बोलावं ?

सुनील प्रभू – ब्रेक आधीचा प्रश्न होता त्यात मी उत्तर देताना म्हणालो की व्हाट्स अॅपवर पत्र पाठवलं होतं. पण नंतर विचार करत असताना खरी बाजू पटलावर यावी म्हणून जोशी यांच्याशी बोलून गोष्टीची शहानिशा करून सत्य बाजू पटलावर ठेवावी यासाठी अध्यक्षांची परवानगी मागून ही बाब पटलावर आणली.

महेश जेठमलानी : जोशी यांनी २२ जून २०२२ रोजी जे पत्र पाठवले जे मेल द्वारे पाठवले तो मेल एकनाथ शिंदे यांना पाठवला तो मेल दाखवू शकता का ?

सुनील प्रभू मी संगितले हे मी उद्या दाखवतो. चार वाजता जोशी निघून जातात ते निघून गेले नसते तर मी बोलवलं असता. मी सकाळच्या सत्रात सादर करतो.

महेश जेठमलानी : जर ते आता येथे असतील तर त्यांना बोलवू शकतो.

सुनील प्रभू : चेक करतो.