shivsainik priyanka joshi attacks shinde group bkc dasara melava 2022 ssa 97 | Loksatta

“बीकेसीत गद्दारांची सर्दी, शिवाजी पार्कवर निष्ठेची वर्दी”; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तर, बीकेसीवर शिंदे गटाचा मेळावा पार पडत आहे.

“बीकेसीत गद्दारांची सर्दी, शिवाजी पार्कवर निष्ठेची वर्दी”; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे ( संग्रहित फोटो )

शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झालं आहे. तर, शिंदे गटानेही बीकेसी मैदानावर जय्यत तयारी केली आहे. मात्र, शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून शिवसैनिकानं शिंदे गटावर टीका केली आहे.

शिवसैनिक प्रियंका जोशी यांनी बोलताना म्हणाल्या, “बीकेसीत होत असलेल्या मेळाव्याला तिथे गद्दारीची सर्दी आहे, शिवाजी पार्कवर निष्ठेची वर्दी आहे. शिवसेनेच्या मेळाव्यातून विचारांचं सोने, प्रेरणा आणि नवचैतन्य मिळते. शिंदे गटाच्या मेळाव्यात पंचपकवान आहे. मात्र, कोरोनाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंनी दिलेली शिवभोजन थाळी महत्वाची होती. आम्ही घरून ठेचा भाकरी घेऊन आलो आहोत,” असेही जोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव…”; शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचा विचार…”

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या भाषणाला आठ वाजता सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बीकेसी मैदानावरील भाषण सव्वा आठ वाजता सुरु होऊ शकते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dasara Melava 2022: “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान

संबंधित बातम्या

“अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश
“…तर सरकार चालवण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार” ; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!
जे पोटात होतं ते ओठावर आलं; अजित पवारांच्या मनातले मुख्यमंत्री अजूनही उद्धव ठाकरेच, भर पत्रकार परिषदेत घडला किस्सा
“… अन्यथा सुषमा अंधारेंची सभा उधळून लावणार; राडा तर होणारचं”; उस्मानाबादच्या मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा!
घरकुलासाठी उपोषण करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मृत्यू, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मविआ’चा १७ डिसेंबरला महामोर्चा; राज्यपाल, सीमाप्रश्नाबाबत आक्रमक भूमिका
राज्यात लवकरच नवे उद्योग धोरण- फडणवीस
महिलांची ‘आयपीएल’ स्पर्धा महत्त्वाची -हरमनप्रीत कौर
FIFA World Cup 2022: पोर्तुगालसमोर स्विर्त्झंलडचे आव्हान
सेवाभावी कामांमागे धर्मांतराचा हेतू असू नये!; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी