शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी एक पत्र लिहलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंना तमाम माझ्या हिंदूंनो-भगीनींनो म्हणण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल विचारला आहे. तसेच, मुख्यमंत्री असताना अजानची स्पर्धा शिवसेनेने भरवली होती, अशी टीकाही करण्यात आली आहे. यावरून माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कोणी एैरा, गैरा नट्टू खैरा पत्र लिहतो, त्याची आम्ही दखल घेत नाही. लोकशाहीत पत्र लिहण्याचा अधिकार आहे, तेवढ्याचं हिशोबात रहावे. उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्याची तुमची लायकी नाही. स्वत:चा पक्ष कसा वाढेल, यावरती लक्ष द्या. तमाम माझ्या हिंदूंनो-भगीनींनो म्हणण्याचा अधिकार सर्वांना आहे,” असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – “राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, पण वज्रदंतीचे ब्रँड…”; ऊस खातानाच्या फोटोवरून भाजपा आमदाराचा टोला

“शेतकरी, बेरोजगार आणि गरीब रडत आहे”

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी पैशाचा वापर केल्याबाबत किशोर पेडणेकरांना पत्रकारांनी सवाल विचाराला. त्यावर त्यांनी म्हटलं, “शेतकरी, बेरोजगार आणि गरीब रडत आहे. मात्र, शिंदे गटातील दसरा मेळाव्यात जेवणाच्या पंगती उठणार आहे. लोकांना लुभवण्यासाठी ते युक्तांचा वापर करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील दसरा मेळाव्यात आणण्यात येणार आहे,” असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला.

हेही वाचा – “अजित पवारांनी पंधरा वर्षे निवांत रहायचं”, शहाजी बापू पाटलांचा टोला; म्हणाले, “शीवतीर्थावर राष्ट्रवादीचा…”

“आपल्याला विचाराचे सोने लुटायचे आहे”

‘भाषण करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल,’ असे उपमुख्मयंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर विचारले असता किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं, “देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनीही याबाबत सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे कधीही आपल्या भाषेची पातळी सोडत नाही. अन्य नेत्यांनीही आपल्या भाषेचं भान ठेवावे. आपल्याला विचाराचे सोने लुटायचे आहे. कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची चिरफाड करायची नाही,” असा सल्लाही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader kishori pednekar reply mns yogesh khaire letter over uddhav thackeray dasara melava ssa
First published on: 04-10-2022 at 14:27 IST