सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रथमच देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सुमारे चार कोटी रुपयांचा आंबा कॅनिंग प्रकल्पाचा शुभारंभ येत्या २७ एप्रिल रोजी देवगड येथे होत आहे. त्यासाठी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व राज्याचे विधान परिषद उपाध्यक्ष आमदार विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
आंबा कॅनिंगसाठी देवगड तालुका उत्पादन संस्थेने सरकारच्या १:९ भाग भांडवलाचा प्रकल्प केला आहे असे संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांनी सांगितले. त्यासाठी सरकारने १ कोटी ३० लाखांचे भागभांडवल दिले असून, त्याची परतफेड १४ वार्षिक हप्त्यांत करावयाची आहे असे ते म्हणाले. शिवाय राष्ट्रीयीकृत बँकेचे दोन कोटी २५ लाख आणि संस्थेचे ५० ते ६० लाख असा चार कोटींचा प्रकल्प आहे, असे ते म्हणाले.
या प्रकल्पात आंबा, जाम, पल्ब उत्पादित केला जाईल. सहकार तत्त्वावरील प्रक्रिया उद्योग आहे. त्यात शेतकरी व ग्राहक डोळ्यासमोर आहेत. पावसाळ्यात आंबा बेबी कॉन व सीप्ट कॉन सुरू करून शेतीपूरक व्यवसायक उत्पादकांना देण्याचा मानस अॅड. अजित गोगटे यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2013 रोजी प्रकाशित
सिंधुदुर्गच्या आंबा कॅनिंग प्रकल्पाचा २७ एप्रिलला शुभारंभ
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रथमच देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सुमारे चार कोटी रुपयांचा आंबा कॅनिंग प्रकल्पाचा शुभारंभ येत्या २७ एप्रिल रोजी देवगड येथे होत आहे. त्यासाठी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व राज्याचे विधान परिषद उपाध्यक्ष आमदार विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
First published on: 16-04-2013 at 03:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg mango canning project start from 27 april