पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ८८ गावांतील ४३१ जिल्हा परिषदेच्या शाळात पाणी शिरले होते. त्यामुळे शाळेतील वर्ग, साहित्य आदींचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या शाळांची स्वच्छता, दुरुस्ती आणि आवश्यक साहित्य पुन्हा प्राप्त होईपर्यंत घंटा कशी वाजायची, हा प्रश्न पडला आहे. या नुकसानीबाबत तातडीने अहवाल द्या, अशा सूचना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मुख्याध्यापकांना दिले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी, सीना, भीमा, बोरी या नद्यांना आलेल्या पुरामुळे या नदी काठांवर असलेल्या गावांतील अनेक शाळा अद्यापही पाण्यात असल्याने तेथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ज्या शाळेतील पाणी ओसरले आहे, त्या शाळेची साफसफाई सुरू करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे शाळेतील कागदपत्रे, खिडक्या, दरवाजे, टेबल, खुर्ची, संगणक आदी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पुरामुळे शेतीच्या पिकांचे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शाळेचे पण मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळेचे नुकसान झाले आहे. त्यातील काही शाळांची पाहणी केली आहे. पाणी गेलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांना शाळेचे किती नुकसान झाले आहे. याची सविस्तर माहिती पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरच किती नुकसान झाले आहे, याची आकडेवारी समोर येईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांतील अनेक शाळा अद्यापही पाण्यात असल्याने तेथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ज्या शाळेतील पाणी ओसरले आहे, त्या शाळेची साफसफाई सुरू करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे शाळेतील कागदपत्रे, खिडक्या, दरवाजे, टेबल, खुर्ची, संगणक आदी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात नुकसान झालेल्या शाळा
अक्कलकोट तालुक्यातील ७१, बार्शी तालुक्यातील १०, करमाळा तालुक्यातील ५० शाळांचे विविध प्रकारे नुकसान झाले आहे. माढा तालुक्यातील २५, सांगोला तालुक्यातील ६९, मोहोळ तालुक्यातील ६८ शाळांचे नुकसान झाले आहे. तर माळशिरस येथील ५५, मंगळवेढा – ५, पंढरपूर – ३६, उत्तर सोलापूर – ७, दक्षिण सोलापूर येथील ३५ असे एकूण ४३१ शाळेचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे.