सोलापूर : सावकारी फाशात अडकलेल्या एका मंदिराच्या पुजार्‍याने सावकारांच्या आर्थिक शोषणामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातील कव्हे येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी एका महिलेसह दोन सावकारांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागनाथ महादेव गुरव (वय ५८) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पुजार्‍याचे नाव आहे. त्यांचा मुलगा धन्यकुमार गुरव यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण ऊर्फ दादा दत्तात्रय हजारे आणि जिजाबाई सुभाष घळके-माने (दोघे रा. कव्हे) या दोघा खासगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, “पक्ष चोरला म्हणत लहान बाळासारखं किती दिवस…”

मृत नागनाथ गुरव हे कव्हे गावचे ग्रामदैवत मारूती मंदिराचे वंश परंपरेने पुजारी होते. पहाटे घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली दोन पत्रे घरातील देवघरात देवतांच्या प्रतिमांमागे आढळून आली. त्यामधील पहिल्या पत्रात गावातील लक्ष्मण दत्तात्रय हजारे याच्याकडून दहा हजार रुपयांचे कर्ज दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याने व्याजासह कर्जवसुलीसाठी तगादा लावला होता. यात असह्य त्रास देत होता.

हेही वाचा…लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेंनी मांडला बाजार; सोलापुरात दोन नेट कॅफेंवर गुन्हा दाखल

त्यामुळे आपले जगणे मुश्किलीचे झाल्याचे म्हटले आहे. तर दुस-या पत्रात, गावातील जिजाबाई घळके-माने हिचा दारूचा व्यवसाय असून तिच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. तिला कर्जाएवढेच २१ हजार रुपये व्याज दिले होते. तरी सुध्दा ती रोज मला शिव्या देत होती. मला पोलिसांनी न्याय द्यावा, असे म्हणून दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नागनाथ गुरव यांनी नमूद केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur temple priest commits suicide due to moneylender exploitation case registered against two lenders psg